देश-विदेशमनोरंजन

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला गंभीर इशारा

Newslive मराठी- अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. सुशांतच्या वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. बुधवारी बिहारमधून चार पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झालं होते.

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपाबाबत सर्वांचा जबाब नोंदवण्यास बिहार पोलिसांनी सुरुवात केली आहे. यावर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती या संपूर्ण प्रकरणाची सीबाआयद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे. मायावती म्हणाल्या की, मूळचा बिहारचा तरुण बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत.

त्याच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरनंतर या प्रकरणाचं गूढ आणखीन वाढलं आहे. आता या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र किंवा बिहार पोलिसांकडून होण्याऐवजी सीबाआयद्वारे होणं योग्य आहे’ असे मायावतींनी सांगितले आहे.

तसेच सुशांत राजपूत प्रकरणात महाराष्ट्र आणि बिहारच्या काँग्रेस नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे असं दिसतंय की त्यांचा खरा हेतून या प्रकरणाच्या आडून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा आहे, अशी टीका देखील मायवती यांनी काँग्रेसवर केली आहे. त्याचप्रमाणे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने गंभीरता दाखवावी, असं देखील मायवती यांनी सांगितले आहे. याप्रकरणी आतापर्यंत अनेक कलाकारांची चौकशी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

-व्याघ्र दिन एका दिवसापुरता मर्यादीत राहता कमा नये– मुख्यमंत्री