खेळ

पदार्पणाच्या कसोटीत मयांक अग्रवालने नोंदवला अनोखा विक्रम

Newslive मराठी:  हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात टीम इंडियाने के. एल. राहुलला वगळून मयांक अग्रवालला संधी दिली. या संधीचे सोने करत मयांकने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकीय खेळी साकारत एक अनोखा विक्रमाची नोंद केली.

ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतकीय खेळी करणारा तो दुसरा हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. यापूर्वी दत्तात्राय गजानन फाडकर यांनी १९४७-४८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पदार्पणाच्या कसोटीत ५१ धावांची खेळी केली होती. मयांकने ७६ धावांची खेळी करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

पहिल्या कसोटीत पास मयांक अग्रवालने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याचा समर्थपणे सामना केला. पहिला सामना असतानीही त्याच्यावर कोणतेही दडपण दिसत नव्हते. स्टार्क, कमिन्स, लायन या गोलंदाजांना मयांकने थोपवून धरत अर्धशतकी खेळी केली. मयांकने बाद होण्यापूर्वी ७६ धावांची खेळी केली. कमिन्सच्या गोलंदाजीवर तो यष्टीमागे बाद झाला.