आरोग्यलाइफस्टाईल

पुरूषांसाठी आलं आता गर्भनिरोधक ‘जेल’

टिम Newslive मराठी: आजकाल तरूणांना कॉन्डमचा वापर करायला आवडत नाही तर दुसरीकडे गर्भनिरोधक गोळ्या वापरल्याचे मुलींच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. यामुळेच आता शास्त्रज्ञांनी पुरूषांसाठी एक जेल तयार केलं आहे ज्यामुळे त्यांची स्पर्म निर्मिती तात्पुरती कमी होईल. या जेलमुळे संभोगाचा आनंदही घेता येईल आणि मुलं होण्याची भीतीही राहणार नाही.

पॉप्युलेशन काऊन्सिल आणि एनआयएच या दोन आंतरराष्ट्रीय संस्थांच्या शास्त्रज्ञांनी या जेलची निर्मिती केली आहे. या जेलचे नाव एनईएसट असून युनिस केनेडी श्रीवर यांनी या जेलच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

डॉ डायना ब्लिथ यांनी दिलेल्या माहितीनुसार हे जेल खांद्यावर किंव पाठीवर लावाता येईल. यामध्ये टेस्टोस्टॉरोनचे प्रमाण काही काळापुरते कमी करण्याचे गुण आहेत. त्वचेतून शरीर हे जेल शोषून घेईल आणि टेस्टोस्टेरोनची पातळी कमी करेल ज्याने स्पर्म काउन्ट कमी होईल. जेलचा प्रभाव संपल्यावर टेस्टोस्टेरॉनची पातळी पुन्हा पुर्ववत होईल. या जेलची ४२० जोडप्यांवर टेस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही निरोधाशिवाय संभोगाचा आनंद घेता येणार आहे.