आंतरराष्ट्रीय बातमी लाइफस्टाईल

पंतप्रधानांच्या फोटोचा गैरवापर केल्यास होणार शिक्षा

Newslive मराठी – मंत्र्यांसोबत फोटो काढून काही जण आपली एखाद्या मंत्र्याशी किती जवळची ओळख आहे, हे दाखवण्याचा दावा करतात. परंतू, आता राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा देशाचं राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्राचा, चुकीचा किंवा व्यावसायिक कामासाठी वापर केल्यास सरकारकडून कडक कायदे करण्यात येणार आहेत.

व्यापार किंवा व्यवसायाला चालना देण्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींच्या फोटोचा अयोग्य किंवा अनधिकृत वापर केल्यास १ ते ५ लाख रुपयांचा दंड आणि ६ महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्रच्या फोटोचा चुकीचा किंवा व्यावसायिक कारणांसाठी वापर केल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *