Newslive मराठी- पंढरपूरचे आमदार भारत भालकेंना अटकपूर्व जामीन मंजूर झाला.
विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरातील विक्रेत्यांची अतिक्रमणे काढण्यावरून त्यांनी पोलिस निरीक्षक विश्वास सोळोखेंना शिवीगाळ केली होती. यामुळे भालकेंच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
त्या प्रकरणी भालकेंनी येथील सत्र न्यायालयात तात्पुरता अटकपूर्व जामीन दाखल केला होता. तो जिल्हा व सत्र न्यायाधिश एन. पी कापुरेंनी मंजूर केला.