महाराष्ट्रराजकारण

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेसह मनसैनिकांना अटक

मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या लोकल सुरू करण्यावरून आंदोलन करत आहे. मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यासाठी मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र लोकल प्रवास करण्याआधीच पोलिसांनी अडवून कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता रेल्वे पोलिसांनी मनसे सरचिटनिस संदीप देशपांडे यांना अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे.

देशपांडे यांच्यासह इतर 3 मनसे अधिकाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. रेल्वे आणि कोरोनाचे नियम मोडल्यामुळे मनसैनिकांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. आता राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देणार हे महत्वाचे ठरणार आहे.

लोकल सेवा सुरु करा नाहीतर सविनय कायदेभंग करावा लागेल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. यावर सरकारच्या वतीने प्रतिक्रिया दिली गेली नाही.