कोरोनादेश-विदेशराजकारण

मोदी सरकारचा मोठा निर्णय; नोकरी गमावलेल्यांना ९० दिवसांचा अर्धा पगार मिळणार

Newsliveमराठी – नोकरी गेलेल्या हजारो कामगारांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. कामगारांना मिळणाऱ्या बेरोजगार भत्त्यासाठी केंद्राकडून नियम शिथील करण्यात आले आहेत. करोना काळात नोकरी गेलेल्यांसाठी बेरोजगार भत्ता म्हणून तीन महिन्यांचा ५० टक्के पगार दिला जाणार आहे. पण ही सुविधा फक्त कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सदस्य असणाऱ्या कामगारांनाच मिळणार आहे. पीटीआयने याबाबतच वृत्त दिलं आहे.

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने हजारो कामगारांनी नोकऱ्या गमावल्या असून अर्थव्यवस्थेलाही याचा फटका बसला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे औद्योगिक कामगारांना दिलासा मिळणार आहे. करोना संकटाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत केली जावी अशी मागणी वारंवार होत होती. दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि नीती आयोगाने नियम शिथील करण्याची मागणी केली होती.