देश-विदेशराजकारण

मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर जोरदार टीका

Newslive मराठी- काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे, त्याचा रोजगार वाढीलाही फटका बसला आहे.

सरकारनं संसदीय समितीला माहिती देताना 10 कोटी नोकऱ्या धोक्यात आल्याची माहिती दिली आहे. मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

संसदेच्या स्थायी बैठकीत केंद्रीय अधिकाऱ्यांना धोक्यात आलेल्या नोकऱ्यांबद्दल माहिती दिली. कोरोनाचा परिणाम झाल्यामुळे देशात 10 कोटी नोकऱ्या संकटात असल्याचं केंद्र सरकारनं समितीला सांगितले. हे वृत्त ट्विट करून राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे, मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत. पहिली नोटाबंदी. दुसरी जीएसटी. तिसरी कोरोना महामारीत झालेली वाईट परिस्थिती आणि चौथ म्हणजे अर्थव्यवस्था व रोजगाराचा झालेला सत्यानाश. त्यांच्या भांडवलशाही माध्यमांनी मायाजाळ तयार केलं आहे. हे भ्रम लवकर तुटणार आहेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. सध्या कोरोनाचे उद्रेक वाढत आहे. यावरून विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

-सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला गंभीर इशारा