देश-विदेशराजकारण

“मोदी है तो मुमकिन है”- राहुल गांधी

Newsliveमराठी – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन.आर.नारायण मूर्ति यांनी देशाच्या जीडीपीमध्ये स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी नारायण मूर्ति यांच्या वक्तव्याच्या एका वृत्ताचा संबंध देत “मोदी है तो मुमकिन है” असं म्हणत टोला लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे अर्थव्यवस्थेवरून सतत केंद्र सरकारवर टीका करत आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेच्या कंझ्युमर कॉन्फिडन्स सर्वेक्षणाचा हवाला देत अर्थव्यवस्था आणि रोजगाराची स्थितीबाबत अधिक वाईट वृत्त समोर येणार असल्याचं म्हटलं होतं. लोकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना मोठ्या स्तरावर पोहोचली आहे. तर लोकांचा विश्वास आतापर्यंतच्या सर्वात खालील स्तरावर पोहोचला असल्याचं ते म्हणाले. बंगळुरूमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी आता मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.