महाराष्ट्रराजकारण

मोदीना पंतप्रधान करण्यासाठी राज्याचा दौरा करतोय- रावसाहेब दानवे

Newslive मराठी-  आगामी २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या एक महिन्यांपासून मी स्वतः राज्याचा दौरा करीत आहे. असं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या लोकसभा आढावा बैठकीनिमित्त दानवे नगरला आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले विरोधकांनी कितीही एकत्र येवून तारे तोडले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरलेला आहे.

दरम्यान, विरोधकांचे अजूनही एकमत होत नाही. राहुल गांधी यांचे नाव काढले, तरी तामिळनाडूत एकत्र आलेले बाजुला होतील. अशीच स्थिती अनेक ठिकाणची आहे. त्यांचा उमेदवार जाहीर झाला, की लगेच त्यांच्यात भांडणे होतील’, अशा शब्दांत दानवे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.