महाराष्ट्रराजकारण

सभा मोदींची पण चर्चा धनंजय मुंडेंची; पंकजाताईंना जळी स्थळी काष्टी धनंजयच दिसतोय?

Newslive मराठी- परळी वै. (ऑनलाईन प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठवाड्यातील सभा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीत वळवली. गेल्या 4 दिवसांपासून सभेची जय्यत तयारी सुरू असून, त्याचबरोबर परळी मुक्कामी असलेल्या पंकजा मुंडे स्वतःसाठी व युतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभाही घेत आहेत.

मात्र ताई भाजप सरकारने गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांऐवजी केवळ विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टिका करताना दिसतात. ही परिस्थिती केवळ परळी, अंबाजोगाई तालुक्यापुरती मर्यादित नसून, त्या उपर बीड जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर झालेल्या सभांमधूनही पंकजाताईंनी धनंजय मुंडेंवर टिका करण्यातच धन्यता मानल्याचे दिसते.

सोमवार दि.14 ऑक्टोबर रोजी ताईंनी स्वगृही पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी यांच्या सभेबाबत सविस्तर माहिती सांगितली. परंतू, त्यातही धनंजय मुंडे हेच टिकेचे लक्ष्य होते. एकुणच नरेंद्र मोदी हे भाजपचे एकमेव सर्वश्रेष्ठ प्रचारास्त्र आहेत. हे अस्त्र थेट धनंजय मुंडे यांच्या विरोधात उपसल्यामुळे काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर ‘मला परळीच्या निवडणूकीची भिती वाटते’ हे पंकजाताईंचे वाक्य समर्पक व वास्तववादी असल्याचे समजते.

एकीकडे परळी विधानसभा मतदारसंघात सत्तेचा उपयोग शाश्वत विकास कामे करण्यासाठी केला असता, मागील निवडणूकीत दिलेली आश्वासने पूर्ण केली असती, वेळीच वैद्यनाथ कारखान्याकडे लक्ष दिले असते व झालेली दुरावस्था रोखली असती, पीक विम्यातील दिरंगाई, कर्जमाफीवरून झालेली शेतकर्‍यांची फसवणूक व त्यावरील ताईंचे मौन या व अशा अनेक गोष्टी घडल्या नसत्या तर मोदींना परळीत सभा घ्यायची आवश्यकता भासली नसती. अशा प्रतिक्रीया समाज माध्यमांवर उमटताना दिसत आहेत.

दिल्लीश्वर मोदी थेट ‘बहन पंकजा’ च्या मदतीला परळीत येत असले तरी, पंकजाताईंची पूर्व तयारी, मिडीयाबाजी, वातावरण निर्मिती व एकुणच प्रचार केवळ धनंजय मुंडे यांच्या अवती भोवती असून, आता ताईंना जळी स्थळी काष्ठी धनंजय मुंडे दिसत आहेत, अशी चर्चा परळी विधानसभा मतदारसंघातील लोक चौका-चौकात व समाज माध्यमांवर रंगवताना दिसत आहेत. त्यामुळे ‘हा धनंजय मुंडे इतका सोप्पाय का ?’ धनंजय मुंडे यांचे हे वाक्य विचार करायला लावणारे आहे, हे नक्कीच!

तर मोदींना आणायची वेळ आलीच नसती – परळीकरांच्या पंकजताईना कोपरखळ्या

धनंजय मुंडेंची कॉपी करणाऱ्या कॉपी ताई पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi