महाराष्ट्र राजकारण

मोदींची सभा म्हणजे डोक्याला ताप; उद्विग्न जनता त्रस्त

Newslive मराठी- परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ ऑक्टोबर रोजी परळीत सभा घेणार आहेत. मात्र, यासभेने नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यापेक्षा असह्य झाले आहे असेच म्हणावे लागेल. कोट्यवधी वृक्ष लागवडीचा फार्स करणाऱ्या सरकारने अर्ध्या तासांच्या सभेसाठी तहसील समोरील झाडांची कत्तल केली आली. तसेच मैदानात काही भटके मोल मजुरी करणारे गरीब वंचीत कुटुंबांच्या झोपड्या होत्या त्यासुद्धा निर्दयी शासनाने तोडून त्यांना बेघर केले आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी देण्यात आली आहे. जर पंतप्रधान येत असतील आणि नागरिक असुरक्षित असतील तर सामान्य जनतेला वाली कोण? असा प्रश्न निर्माण होतो. इतकेच काय सध्या वैद्यनाथ महाविद्यालयात परीक्षा सुरू आहेत त्या सुद्धा स्थानांतरित केल्याचे वृत्त आहे.

शहरातील मुख्य रस्ते परळी – अंबाजोगाई, परळी – गंगाखेड, परळी – बीड हे काही तासांसाठी बंद करण्यात येणार आहेत. थोडक्यात सर्व प्रवाशी व शहरातील नागरिकांना एकप्रकारे स्थानबद्ध करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान येणार म्हंटल्यावर उत्साह हवा पण इथे तर प्रचंड अस्वस्थता भाजपच्या नेते मंडळी अन कार्यकर्त्यांत पसरली आहे. त्यामुळे मोदींची येथील सभा ही नागरिकांसाठी तापदायक ठरली आहे अशी चर्चा नागरिक करत आहेत.

तर मोदींना आणायची वेळ आलीच नसती – परळीकरांच्या पंकजताईना कोपरखळ्या

धनंजय मुंडेंची कॉपी करणाऱ्या कॉपी ताई पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *