आंतरराष्ट्रीयदेश-विदेश

एकाच दिवसात भारतात कोरोनाचे 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले

Newslive मराठी-  कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, भारतात एकाच दिवसात कोरोना व्हायरसचे 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा शनिवारी दुपारपर्यंत 271 वर पोहोचला आहे.

तर कोरोनामुळे कर्नाटक, दिल्ली, पंजाब, महाराष्ट्रात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई-जबलपूर असा गोदान एक्स्प्रेसने प्रवास करणारे 4 रेल्वे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे संकट वाढले आहे.

दरम्यान, चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने आता जगभरात रौद्र रुप धारण केले असून तब्बल 180हून अधिक देशांना विळखा घातला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 10049 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच इटलीमध्ये एका दिवसात 475 लोकांचा मृत्यू झाला होता.

तर इटलीत काल दिवसभरात कोरोनामुळे 627 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इटलीतील कोरोनाच्या बळींचा आकडा चीनच्याही पुढे म्हणजेच सुमारे चार हजारांच्या पुढे गेला आहे.

महत्वाच्या बातम्या-

दोन पोते कंडोम जप्त

कोरोना इफेक्ट- महिनाभर इंटरनेट फ्री

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हे’ नियम पाळा

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi