महाराष्ट्रशैक्षणिक

विद्यापीठातील प्रवेशासाठी चुरस;साडेपाच हजार जागांसाठी २७ हजारांहून अधिक अर्ज

Newsliveमराठी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठीच्या ५ हजार ६५३ जागांसाठी एकू ण २७ हजार ७८७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे विद्यापीठातील प्रवेशासाठी चुरस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील शैक्षणिक विभागांमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे. २०२०-२१साठीच्या प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १० ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीत २७ हजार ७८७ विद्यार्थ्यांनी अर्ज के ले आहेत. पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश क्षमता ३ हजार ३५३ आहे. त्यासाठी २२ हजार ४६७ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. तर पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २ हजार ३०० असून, त्यासाठी २६५० विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी दिली आहे.