कोरोनादेश-विदेश

देशात २४ तासात ६० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित, ८३४ मृत्यू

Newsliveमराठी – जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचा देशात उद्रेक झाल्याचे दिसत आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात ६० हजार ९६३ करोनाबाधित आढळले. तर, ८३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यावरून देशात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही झपाट्याने सुरू असल्याचे दिसून येत आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या आता २३ लाख २९ हजार ६३९ वर पोहचली आहे.

देशभरातील २३ लाख २९ हजार ६३९ करोनाबाधितांच्या संख्येत, अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ६ लाख ४३ हजार ९४८ असून, १६ लाख ३९ हजार ६०० जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. तर, आतापर्यंत ४६ हजार ९१ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर ११ ऑगस्टपर्यंत २,६०,१५,२९७ नमूने तपासले गेल आहेत. यातील ७ लाख ३३ हजार ४४९ नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने एएनआयने दिली आहे.