कोरोनादेश-विदेश

देशात २४ तासांत ६३ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित, ९४४ मृत्यू

Newsliveमराठी – जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचा संसर्ग देशात अद्यापही सुरूच आहे. मागील चोवीस तासांत देशभरात ६३ हजार ४८९ जण करोनाबाधित आढळले आहेत. तर ९४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची संख्या २५ लाख ८९ हजार ६८२ वर पोहचली आहे.

देशातील २५ लाख ८९ हजार ६८२ करोनाबाधितांमध्ये ६ लाख ७७ हजार ४४४ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले १८ लाख ६२ हजार २५८ जण व आतापर्यंत मृत्यू झालेले ४९ हजार ९८० जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाल्याने याबाबत माहिती दिली आहे.

त्याचप्रमाणे, १५ ऑगस्टपर्यंत देशात एकूण २,९३,०९,७०३ नमूने तपासले गेले असून, यातील ७ लाख ४६ हजार ६०८ नमूने काल तपासल्या गेले आहेत. आयसीएमआरने याबाबतची माहिती दिली आहे.