कोरोनादेश-विदेश

देशात २४ तासांत ६५ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित तर ९९६ मृत्यू

Newsliveमराठी – जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचा संसर्ग देशात अद्यापही झपाट्याने वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात तब्बल ६५ हजार २ जण करोनाबाधित आढळले आहेत.

तर ९९६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची संख्या २५ लाख २६ हजार १९३ वर पोहचली आहे.

देशातील २५ लाख २६ हजार १९३ करोनाबाधितांमध्ये ६ लाख ६८ हजार २२० अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले १८ लाख ८ हजार ९३७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेले ४९ हजार ३६ जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाने यायबतची माहिती दिली आहे.

तसेच, १४ ऑगस्टपर्यंत देशात एकूण २,८५,६३,०९५ नमूने तपासले गेले असून, यातील ८ लाख ६८ हजार ६७९ नमूने काल तपासल्या गेले आहेत. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.