महाराष्ट्रराजकारण

माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा जास्त आनंद- जितेंद्र आव्हाड

Newslive मराठी- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसलेंचा दारून पराभव झाला.

यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी उदयनराजेंवर निशाणा साधला. यंदाच्या लांबलेल्या पावसाळ्याने महाराष्ट्रात 27 बळी घेतले. साताऱ्यात एक राजकीय बळी घेतला. त्याचं नाव #उदयनराजे भोसले. असे ट्विट आव्हाडांनी केलं.

माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचाच अधिक आनंद आहे, असेही त्यांनी म्हटले.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी एक लाखांपेक्षा जास्त मतांनी उदयनराजे भोसलेंचा पराभव केला.

मोदींची सभा म्हणजे डोक्याला ताप; उद्विग्न जनता त्रस्त

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi