बातमीमहाराष्ट्र

दोन वर्षीय मुलाची हत्या करुन आईची आत्महत्या

टिम Newslive मराठी: पुण्यातील हडपसरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्या बायकोने दोन वर्षाच्या मुलाची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे हडपसरमध्ये खळबळ उडाली आहे. जान्हवी कांबळे आणि शिवांश कांबळे अस या मायलेकाचे नाव आहे.

पहाटे पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासू नेहमी त्रास देत असल्याने त्यांनी हे पाऊल उचल्यांचे बोलले जात आहे. तिचा विवाह हडपसर पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या अमित दत्तात्रय कांबळे याच्याशी झाला होता.

जान्हवीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहली असून यात म्हटलंय की “ अमित (पती) तू माझ्यावर खूप प्रेम करतोस, मात्र वेळ देऊ शकत नाही, हे माझे दुर्दैव. सासू सुजाता ही माझा वारंवार छळ करीत आहे.” ही चिठ्ठी लिहल्यानंतर जान्हवीने शिवांशला ठार मारलं आणि नंतर ओढणीच्या सहाय्याने फास बनवत फॅनला लटकून आत्महत्या केली.