महाराष्ट्रराजकारण

खासदारांना झालेल्या कोरोनामुळे अधिवेशन लवकरच संपण्याची शक्यता

कोरोनामुळे सध्या सर्वकाही ठप्प झाले आहे. कोरोनाच्या संकटामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन निर्धारित वेळेपूर्वी संपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 30 खासदारांना कोरोना संसर्ग झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती संसदेच्या दोन वरिष्ठ अधिका-यांनी दिली. सध्या देशात 53 लाखांहून अधिक कोरोनाचे प्रकरणे नोंदली गेली आहेत.

14 सप्टेंबर रोजी सहा महिन्यांत पहिल्यांदाच संसद अधिवेशनाला सुरुवात झाली आणि 1 ऑक्टोबरपर्यंत काम करायचे होते, पण संसदेच्या कामकाजाचा कालावधी एक आठवड्यानं कमी केला जाऊ शकतो, असे दोन्ही अधिका-यांनी सांगितले.

संसद अधिवेशनाच्या कार्यवाहीत सहभागी असलेल्या दोन अधिका-यांपैकी एकाने सांगितले की, अधिवेशन सुरू झाल्यापासून कोरोना पॉझिटिव्ह खासदारांची संख्या वाढली आहे, त्यामुळे सरकार अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचा विचार करीत आहे. यामुळे अनेक विधयक देखील चर्चेत येणार नाहीत.