बातमीमहाराष्ट्र

‘त्या’ पीडितेला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरणार खासदार नवनीत राणा

Newslive मराठी-  कोरोना रुग्णाच्या संपर्कातील 24 वर्षीय तरुणीचा कोविड लॅबमध्ये गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे सर्व महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.

या घटनेनंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा चांगल्याच संतप्त झाले आहे, पीडित तरूणीला न्याय मिळावा यासाठी मी रस्त्यावर उतरणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले आहे. तर महिला या आधीच सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे मी खासदार झाले तर, देशाची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील झाल्या आहेत. असेही नवनीत राणा यांनी सांगितले.

ही तरुणी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आली होती. त्यामुळे तिची कोरोना चाचणी करणे आवश्यक होतं. त्यामुळेच ती चाचणीसाठी लॅबमध्ये गेली असता, तिच्या गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा आरोपीला अटक केली.

संबंधित 24 वर्षीय तरुणी अमरावती इथे भावाकडे राहत असून, एका मॉलमध्ये नोकरी करते. मॉलमधील कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, संपर्कातील 20 जणांचे स्वॅब 28 जुलैला ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणाऱ्या आरोपी अल्पेश देशमुखने संबंधित मुलीला परत बोलावून तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, तुम्हाला युरिनल तपासणी करावी लागेल, असे सांगितले.

यानंतर त्या तरुणीने ही बाब वरिष्ठ महिला सहकाऱ्यास सांगितली. त्या दोघींनी महिला कर्मचारी नाही का, असे विचारले. त्यावर लॅब टेक्निशियनने महिला नसल्याचे सांगितले. या प्रकरणावरून आता सरकारवर देखील टीका होऊ लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर जोरदार टीका

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi