महाराष्ट्रराजकारण

खासदार नवनीत राणा यांनी कोरोनाची लढाई जिंकली; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

खासदार नवनीत राणा यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला तात्काळ हलविण्यात आले होते. नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. मात्र, तब्बेत जास्त बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यांना २ दिवसांपूर्वीच प्रकृती सुधारल्याने आयसीयूमधुन हलवून सामान्य कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांनंतर खासदार नवनीत राणा यांना डिस्चार्ज देण्यात आला असून पुढील २० दिवस त्या क्वारंटाईन राहणार आहेत.

नवनीत राणा यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासऱ्यांसह कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली होती. ६ ऑगस्ट रोजी नवनीत राणा व रवी राणा यांचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच उपचार सुरु होते. दरम्यान, संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाने विळखा घातल्याने त्यांच्या मतदार संघात हळहळ व्यक्त केली जात होती.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांपासून राज्यातील अनेक नेत्यांना कोरोना झाला आहे.