कोरोनामहाराष्ट्रराजकारण

खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली, पुढील उपचारासाठी मुंबईत दाखल

Newsliveमराठी – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. सध्याच्या त्यांच्यावर नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. आता त्या मुंबईला रवाना झाल्या आहेत. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.खासदार नवनीत राणांना ६ ऑगस्टला करोनाची बाधा झाली. सुरुवातीला अमरावती येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांना श्वास घेताना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खासदार राणा या मुंबईला महामार्गाने मुंबईला जाणार आहेत. त्या प्रवासाकरिता सुमारे १२ ते १५ तासांचा कालावधी लागणार आहे. सध्या राणा कुटुंबात आमदार रवी राणा यांचे वडील, आई, बहीण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या यांच्या सह खासदार नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलगाही करोनाबाधित आहेत.