महाराष्ट्रशैक्षणिक

‘एमपीएससी’कडून परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

कोरोनामुळे सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यातच एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यावर आयोगाने संकेतस्थळावर स्वतंत्रपणे परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल, असं जाहीर केलं होतं. अखेर आयोगाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा – 2020, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-2020 या तिन्ही परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा – 11 ऑक्टोबर 2020, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-22 नोव्हेंबर 2020 आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – 1 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तसेच उमेदवार आणि परीक्षा आयोजनातील सर्व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, असं आयोगाने सांगितलं. यामुळे आता परीक्षा देणाऱ्यांची तयारी करावी असेही आयोगाने सांगितले आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.