खेळमहाराष्ट्र

पहिल्या प्रेमामुळे एमएस धोनीने घेतली भारताच्या स्वातंत्र्यदिनी निवृत्ती!

काल भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारताच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा शेवट करताना लिहिले की, सर्वांच्या प्रेमासाठी आभार. आज संध्याकाळी ७.२९ नंतर मला निवृत्त समजा. पण तुम्हाला माहिती आहे का की, धोनीने त्याच्या निवृत्तीसाठी १५ ऑगस्ट हा दिवस का निवडला असावा? या प्रश्नाचे उत्तर शोधताना चाहत्यांनी वेगवेगळे अंदाज लावले.

यामागील खरे कारण आहे धोनीचे पहिले प्रेम. धोनी त्याचे कुटुंब आणि क्रिकेट यापेक्षाही दूसऱ्या कोणत्यातरी गोष्टीवर खूप प्रेम करतो. ही गोष्ट म्हणजे, ‘भारत देश’. धोनीने अनेकवेळा वेगवेगळ्या माध्यमातून सिद्ध केले आहे की, त्याच्यासाठी भारत देशापेक्षा जास्त मोठे अजून काहीच नाही. म्हणूनच बहुदा धोनीने क्रिकेटव्यतिरिक्त भारतीय सैन्यामध्ये सेवा देण्याचा निर्णय घेतला होता.

२०१५ साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने विश्वचषकाचे आयोजन केले होते. त्यावेळी धोनी हा भारतीय विश्वचषक संघाचा कर्णधार होता. त्याचवेळी धोनीची पत्नी साक्षी धोनी ही गरोदर होती. आणि धोनी वडील बनल्याची आनंदाची बातमी ऐकल्यानंतरही घरी परतला नव्हता.

याविषयी बोलताना धोनी म्हणाला होता की, यावेळी माझ्यासाठी माझा देश महत्त्वाचा आहे. बाकी सर्वजण माझी वाट पाहू शकतात. तो त्याच्या नवजात मुलीला जवळपास पावणे दोन महिन्यांनी भेटला होता.

२०११ साली १९८३ पासून तब्बल २८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताने विश्वचषक पटकावला होता. त्या ऐतिहासिक विजयानंतर धोनीला खूप सन्मान मिळू लागला. त्याला भारतीय सैन्यदलात लेफ्टनन्ट कर्नलच्या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले होते. धोनीने एकदा म्हटले होते की, जर तो क्रिकेटपटू नसता. तर तो भारतीय सैन्यामध्ये सहभागी झाला असता.