महाराष्ट्रराजकारण

मुंबई महापालिकेची कारवाई अवैध, मला दोन कोटींची नुकसान भरपाई द्या – कंगना रणावत

कंगना रणावत आणि शिवसेना यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवून तोडक कारवाई करणाऱ्या मुंबई महापालिकेकडून अभिनेत्री कंगना राणावतने दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. महापालिकेची कारवाई अवैध आहे, असे कंगनाने याचिकेत म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाचे ऑफिस पालिकेने पाडले होते.

कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयात अवैध बांधकाम असल्याचा आरोप महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. त्यावर चोवीस तासात उत्तर देण्याचे आदेश ही पालिकेने दिले होते. मात्र तीने दिलेला खुलासा अमान्य करून पालिकेने पाडकाम केले आहे. याविरोधात तीने एड रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेत आता सिद्दीकी यांनी नवीन मुद्दे आणि मागणी नमूद केले असून सोमवारी रात्री सुधारित याचिका दाखल केली.

अधिकार्यांनी विनापरवानगी घरामध्ये घुसखोरी केली, कारवाईच्या नावाखाली जाणीवपूर्वक तेथील झुंबर, सोफा आणि अन्य महत्त्वाचे दुर्मिळ सामानाची अवैधपणे तोडफोड केली आहे, बंगल्यातील सुमारे चाळीस टक्के बांधकाम तोडलेले आहे, त्यामुळे भरपाई म्हणून महापालिकेने दोन कोटी रुपये द्यावे अशी मागणी याचिकेत केली आहे. आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार हे लवकरच समजेल