महाराष्ट्रराजकारण

ड्रग्ज विषयाकडे मुंबई पोलिसांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज- शरद पवार

सध्या सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. याप्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत. अभिनेत्री कंगना राणावतने नेपोटिझम विषयी आवाज उठवला होता. याचबरोबर या प्रकरणात सुशांतने ड्रग्ज घेतल्याचे समोर आले. सुशांतला ड्रग्ज पुरवल्या प्रकरणी रिया चक्रवर्तीसह भावाला अटक करण्यात आली.

मुंबई पोलिसांविरोधात तपासाबाबत आक्षेप घेण्यात आला. यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांना बारकाईने लक्ष देण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. सुशांतसिंह प्रकरणामुळे समोर आलेल्या ड्रग्जच्या विषयाकडे मुंबई पोलिसांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.

तरुण पिढीमध्ये अशी व्यसनाधीनता वाढवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे थांबायला हवं. यात तरुणांचे पालक व मुंबई पोलिसांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी अजून मोठी नावे देखील पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकरण अजून वाढणार आहे.