मनोरंजन महाराष्ट्र

कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचे मुबंई पोलिसांना आदेश

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगनावर लावण्यात आला असून त्यामुळेच तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

महोम्मद साहिल अशरफ अली सय्यद नावाच्या एका व्यक्तीने कंगना विरोधात मुंबई वांद्रे कोर्टात गेले होते. या व्यक्तीने असा दावा केला होता की कंगना रनौत आपल्या ट्वीट आणि आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमांतून बॉलिवूडमध्ये हिंदू-मुस्लिम असे दोन गट करण्याचा प्रयत्न करत आहे.

तसेच या व्यक्तीचं म्हणणं आहे की, कंगना धार्मिक तेढ निर्माण करत असून हिंदू-मुस्लिम समुदायांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या व्यक्तीनं केली होती. त्यासाठी त्यांनी कोर्टासमोर तिचे व्हिडीओ, ट्वीट्स सादर केले होते. यासर्व गोष्टींची शहानिशा करून कोर्टानं मुंबई पोलिसांना कंगनावर एफआयआर दाखल करून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *