कोरोनामहाराष्ट्र

आता मुंबई पूर्णपणे अनलॉक होण्याची शक्यता होणार

कोरोनामुळे पूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच रुग्णांच्या मृत्यूमध्ये देखील वाढ होतं आहे.

मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली नसून, चाचण्यांचे प्रमाण दुप्पट केल्यामुळे रुग्णवाढ दिसत असल्याचा दावा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे. ते याबाबत कॉन्फेडरेशन इंडियन इंडस्ट्रिजमार्फत आयोजित परिषदेत ‘कोरोनाविरुद्ध लढा व पुढील वाटचाल’ या विषयावर बोलत होते. ते म्हणाले की, मुंबईकरांचे सहकार्य मिळाल्यास कोरोनाचा प्रसार लवकरच नियंत्रणात येऊ शकतो. तसेच लवकर करोनाचा प्रसार कमी झाल्यास फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुंबई पूर्णपणे अनलॉक करता येईल.

मुंबईत गेल्या महिन्याभरात कोरोना मृत्युंचे प्रमाण २.२ टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच सध्या मुंबईतील कोरोना मृत्यूचे प्रमाण ४.५ टक्के आहे. परंतु, रुग्ण वाढले, तरी त्यांना आवश्यक आरोग्य सुविधा देण्यास पालिका सक्षम असल्याचेही यावेळी बोलताना आयुक्तांनी सांगितले आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.