महाराष्ट्रलक्षवेधीशैक्षणिक

बारामतीत माय लेकराचे एकाच वेळी दहावीत यश संपादन

Newslive मराठी-  (रणजित कांबळे) बारामती तालुक्यातील पारवडी गावातील गुरव कुटुंबात दहावीच्या परिक्षेचा निकालाचा आनंद व्दिगुणित झाला आहे. कारण पण तसेच आहे. नुकताच इयत्ता दहावीचा निकाल लागला. या परीक्षेत वयाच्या 36 व्या वर्षी आईने आपल्या दोन्ही मुलांच्या मदतीने दहावीच्या परीक्षेत 64.40 टक्के गुण मिळवत अपुर्ण स्वप्न पुर्णत्वास आणले आहे.

बेबी गुरव असे या आईचं नाव आहे. त्यांच्या थोरल्या मुलगा सदानंद याने देखील दहावीच्या परीक्षेत 73.20 टक्के गुण मिळवले आहे. दरम्यान, सदानंद हा अभ्यास करता करता आईला देखील अभ्यास करण्यासाठी मदत करीत होता. स्वयंपाक करताना शेजारी बसून, जेवताना करते वेळी बेबी गुरव यांचे दोन्ही मुलं त्यांना मार्गदर्शन करत होते. आता बेबी गुरव यांना बारावी तसेच पदवीचे शिक्षण घेण्याची महत्वकांक्षा आहे. सध्या बेबी गुरव ह्या बारामती एमआयडीसी येथील टेक्सटाईल पार्कमध्ये पायोनिअर कॅलिकोज कंपनीमध्ये शिवणकाम करतात. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ हे त्यांचं माहेर असून वडिलांच्या वेडसरपणा तसेच कौटुंबिक कारणाने त्यांची दहावी पास होण्याची इच्छा पुर्ण होऊ शकली नाही.

बेबी गुरव यांचा मुलगा सदानंद गुरव हा रयत शिक्षण संस्थेच्या नागेश्वर विद्यालय शेटफळगढे ता. इंदापूर येथे दहावीचे शिक्षण घेतले. तर धाकटा मुलगा आठवीत शिक्षण पुर्ण केलं आहे. त्यांनी पतीच्या आग्रहास्तव दहावीची परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. बेबी गुरव यांना बांदलवाडी येथील बालविकास विद्यालयातून परिक्षा दिली. दिवसभर कंपनीतून काम करून आल्यानंतर त्या घरकाम उरकून दहावीचा अभ्यास करीत असत. त्यांनी दहावीतील यशाबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे. दोघांनी दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

दरम्यान, बेबी गुरव या बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये पायोनिअर कॅलिकोज कंपनीमध्ये शिवणकाम करतात. बेबी गुरव यांनी पती प्रदीप गुरव यांच्या प्रोत्साहनामुळे दहावीची परिक्षा देण्याचा निर्णय घेत कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून दहावीत घवघवीत यश मिळविले.

महत्वाच्या बातम्या-

-‘त्या’ पीडितेला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरणार खासदार नवनीत राणा

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi