आंतरराष्ट्रीयबातमी

माझा दुसरा मुलगाही सैन्यात पाठवतो पण…

Newsive मराठी-  पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४० जवान शहिद झाले. २० जवान जखमी झाले.

शहिद जवान रतन ठाकूर यांच्या वडिलांनी या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं की मी माझा दुसरा मुलगाही भारत मातेच्या रक्षणासाठी सैन्यात पाठवायला तयार आहे, माझी इच्छा फक्त एकच आहे की पाकिस्तानला धडा शिकवा. त्यांनी जी मागणी केलीय तीच मागणी संपूर्ण देशातून केली जात आहे.

दरम्यान, या हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

पंतप्रधानांची ग्वाही; शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही…

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi