कोरोनामहाराष्ट्र

फलटणच्या नाईक निंबाळकरांनी १०० वर्षांचा जुना राजवाडा दिला कोविड रुग्णांसाठी

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर घराण्याने लोकाभिमुख निर्णय घेतला आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला पत्र लिहून त्यांच्या २ वास्तू कोविड रुग्णांसाठी वापरण्याची तयारी दर्शवली आहे. फलटण येथे रामराजे यांच्या मालकीचा १०० वर्ष जुना राजवाडा विक्रम पॅलेस आहे.

कोरोना सेंटरसाठी हा राजवाडा देण्याची तयारी नाईक-निंबाळकर कुटुंबाने दाखवली आहे. या संदर्भात रामराजेंनी सातारा जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिलं आहे आमचे सोनगाव येथील विक्रम पॅलेस आणि फलटण येथील मुधोजी मनमोहन राजवाडा हा कोविड रुग्णांच्या सेवेसाठी देण्याची तयारी आहे.

याठिकाणी कोविड सेंटर उभारलं जाऊ शकतं, ग्रामीण भागात वाढणाऱ्या कोरोना बाधितांमुळे रामराजेंनी हा निर्णय घेतला आहे. फलटण तालुका उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांचा विक्रम पॅलेस देण्याबाबतचे पत्र प्रांताधिकारी यांना दिले आहे. रघुनाथराजे निंबाळकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आहेत. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.