देश-विदेशबातमी

गलवान खोऱ्यातील 20 शहिदांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर

Newslive मराठी-  पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात 15 जूनला चिनी फौजांशी शौर्याने लढताना शहीद झालेल्या 20 भारतीय जवानांची नावे राजधानीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरली जाणार आहेत. यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी काल दिली.

भारत चीन यांच्या फौजांमध्ये 15 जूनच्या रात्री गेल्या पाच दशकांतील सर्वात भीषण संघर्ष झाला होता. चीनकडून  गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉइंट 14 च्या परिसरात टेहळणी चौकीच्या उभारणीला भारतीय सैनिकांनी विरोध केल्यानंतर, चिनी सैनिकांनी खिळे लावलेल्या काठय़ा, लोखंडी कांबी वापरून त्यांच्यावर भीषण हल्ले केले होते.

यात शहीद झालेल्या लष्करी जवानांमध्ये 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी कर्नल बी. संतोष बाबू यांचा समावेश होता.या घटनेमुळे पूर्व लडाखच्या सीमेवरील तणाव मोठय़ा प्रमाणात वाढला. भारताने याचे वर्णनचीनची पूर्वनियोजित कृतीअसे केले होते.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 17 जुलैला पूर्व लडाखमधील लुकुंग सीमा चौकीला दिलेल्या भेटीत, बिहार रेजिमेंटच्या सैनिकांनी चिनी फौजांशी लढताना दाखवलेल्या धैर्याचे कौतुक केले होते.

महत्वाच्या बातम्या-

-जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 70 लाखांवर

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi