देश-विदेशराजकारण

नरेंद्र मोदी त्यांच्यात राजकीय नेतृत्वाची धमक नाही, ते धार्मिक गटाचे नेते- प्रकाश आंबेडकर

Newslive मराठी- प्रकाश आंबेडकर यांनी कोरोनावरून सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारमधील नेत्यांमध्ये राजकीय धमक नाही. त्यापैकी कोणी जातीचे, तर कोणी धर्माचे नेतृत्व करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीय नेते नाहीत. ते धार्मिक गटाचे नेते आहेत. त्यांच्यात राजकीय नेतृत्वाची धमक नाही. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीतून बाहेर येण्यासाठी या नेत्यांकडे दृष्टी नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केला.

प्रकाश आंबेडकर शुक्रवारी औरंगाबादेत आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, देशात कोरोना आता आटोक्यात आला आहे. डॉक्टर्स, वैज्ञानिकांच्या परिश्रमांमुळे कोरोनावर आपण मात केली आहे, हा संदेश सरकारने दिला पाहिजे होता; पण हे वास्तव लोकांसमोर आणण्याची दृष्टी राजकीय नेत्यांमध्ये नाही. केवळ पाच टक्के लोकांमुळे देशातील 95 टक्के लोकांना वेठीस धरणे योग्य नाही. या पाच टक्के लोकांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या उपचाराची योग्य ती काळजी सरकारने घ्यावी.

ते म्हणाले लॉकडाऊनच्या चक्रात केंद्र सरकार, राज्य सरकार स्वत:हून अडकलेले आहे. बाहेर पडण्याचा रस्ता त्यांना दिसत नाही. म्हणून सर्वसामान्य माणसांना माझे आवाहन आहे की, या चक्रव्युहात अडकलेल्या केंद्र आणि राज्य सरकारला रस्ता दाखवण्याची गरज आहे.

आज ईद आहे. दोन तारखेला रविवार आणि तीन तारखेला रक्षाबंधन आहे. यामुळे बस चालू करण्याची मागणी त्यांनी केली. अनेक गोष्टींवरून त्यांनी सरकारवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या-

-फडणवीस सरकारने आणलेली आणखी एक योजना ठाकरे सरकारने केली रद्द

-पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळते; रावसाहेब दानवेंची शरद पवारांवर कोपरखळी

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi