मनोरंजनमहाराष्ट्र

नॅशनल अवॉर्ड विनर सिनेमटोग्राफरने कंगनामुळे सोडला सिनेमा

कंगना रणावत गेल्या काही दिवसांपासून सतत सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव आहे. आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने बॉलिवूडमधील नेपोटिज्म आणि त्यानंतर इंडस्ट्रीतील ड्रग्सच्या वापरावर धक्कादायक वक्तव्य केलं होतं. यानंतर तिच्यावर अनेकांनी टीकाही केली होती.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेमटोग्राफर आणि डायरेक्टर पीसी श्रीराम यांनी ट्विट करून नुकतीच माहिती दिली की, त्यांना कंगना रनौतची मुख्य भूमिका असलेला सिनेमा ऑफर झाला होता. पण त्यांनी या सिनेमासाठी काम करण्यास नकार दिलाय. आपल्या काही ट्विट्समध्ये श्रीराम यांनी लिहिले की, ‘मला हा सिनेमा सोडावा लागला कारण त्यात कंगना रनौत मुख्य भूमिकेत होती. मला मनातून चांगलं वाटत नव्हतं आणि मी मेकर्ससमोर माझी भूमिका मांडली जे त्यांनी समजून घेतली’.

कंगनाने या ट्विट नंतर लिहिले की, ‘मी तुमच्यासारख्या लीजंडसोबत काम करण्याची संधी गमावली सर. हे पूर्णपणे माझं नुकसान आहे. मला पूर्णपणे माहीत नाही की, तुम्हाला काय खटकतं होतं. पण मला आनंद आहे तुम्ही तुमच्या मनाचं ऐकलं. तुम्हाला शुभेच्छा’.