बातमीमहाराष्ट्र

राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन

Newslive मराठी- राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभेचे विद्यमान आमदार हनुमंतराव डोळस यांचं निधन झालं आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली.  ते 57 वर्षांचे होते.

पहिल्यांदा 2009 मध्ये विधानसभेवर निवडून गेले होते आणि 2014 मध्येही राष्ट्रवादीकडून ते आमदार म्हणून निवडून आले होते.