महाराष्ट्रशैक्षणिक

NEET आणि JEE परिक्षा पुढे ढकला; धनंजय मुंडेंचे उद्धव ठाकरेंना पत्र

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा पुढे ढकलली. त्याचसोबत NEET आणि JEE परिक्षा पुढे ढकलाव्या यासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असा निर्णय दिल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था प्रवेश परीक्षा घेण्याच्या तयारीला लागली आहे. मात्र अनेकांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर NEET आणि JEE परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येते आहे.

दरम्यान देशभरातून लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली इंजिनिअरिंग प्रवेशासाठीची जेईई व वैद्यकीय प्रवेशासाठीची परीक्षा सध्याच्या परिस्थितीत घेणं विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारं ठरू शकतं. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या दोन्हीही परीक्षा काही महिने पुढे ढकलाव्यात यासाठी राज्य सरकारच्या वतीने आग्रही मागणी करण्यात यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे. शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या देखील परिक्षांचा निर्णय अजूनही झाला नाही.