आंतरराष्ट्रीयलक्षवेधी

अशा प्रकारच्या लोकांसोबत कधीही पैश्यांचा व्यवहार करू नका

NEWSLIVE मराठी-  मित्रांनो बहुतांश वेळा लोक आपल्याकडून पैसे घेतात आणि ते परत आपल्याला देत नाहीत. आपलेच पैसे मागण्यासाठी आपल्याला 10 वेळा विचार करावा लागतो. पैश्यांच्या व्यवहाराच्या बाबतीत बोलायचे झाले तर हा व्यवहार खूप समजून आणि काळजीपूर्वक केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला माणसे ओळखता आली पाहिजेत. कोणत्या लोकांसोबत पैश्यांचा व्यवहार करायचा आणि कोणत्या लोकांसोबत पैश्यांचा व्यवहार करू नये.

पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे, जवळच्या नात्यांमध्ये पैश्यांचा व्यवहार करू नका. जवळचे लोकच आपल्याकडून पैसे घेतात आणि जेंव्हा पैसे परत करण्याची वेळ येते तेंव्हा ते वेळेवर पैसे परत करत नाहीत.

  • ज्या माणसाला नोकरी नाही किंवा व्यवसाय बंद पडलेला आहे.
  • जवळच्या नात्यांमध्ये पैश्यांचा व्यवहार करू नका.
  • व्यसनी माणसासोबत कधीही पैश्यांचा व्यवहार करू नका.
  • नेहमी खोटं बोलणाऱ्या लबाड माणसांसोबतही पैश्यांचा व्यवहार करणे टाळा.
  • आज देतो, उद्या देतो अशी कारणे सांगणाऱ्यांना पैसे देऊ नका.