कोरोनादेश-विदेश

देशात नवा उच्चांक, एका दिवसात नऊ लाखांहून अधिक करोना चाचण्या

Newsliveमराठी – भारतात कोविड-१९ या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रतिदिन करोना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात येत असून गुरुवारी भारतात करोना चाचण्यांनी नवा उच्चांक गाठला. चोवीस तासात ९ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

काल चोवीस तासात ९,१८,४७० करोना चाचण्या करण्यात आल्या असून आजवर दिवसभरात झालेल्या या सर्वाधिक चाचण्या ठरल्या आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३.२६ कोटींवर पोहोचली आहे. दरम्यान, देशाचा करोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडण्याचा दर घसरला असून तो ८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सातत्याने करोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येत असल्याने पॉझिटिव्हीटीचा दर कमी झाला आहे. विविध राज्ये सध्या दहा लाख लोकसंख्येच्या मागे दिवसभरात १४०हून अधिक करोना चाचण्या करीत आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.