आंतरराष्ट्रीयदेश-विदेश

भारताबरोबरच केलं होतं न्यूझीलंडने लॉकडाउन, आज १०० दिवसांमध्ये तिथे एकही नवा रुग्ण नाही

Newsliveमराठी -जगात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत चालला आहे. जगभरात २० कोटींच्या जवळपास करोनाबाधित रुग्ण आहेत. यापैकी सात लाख तीस हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक कोटी २७ लाख ३७ हजार ६८९ जणांनी करोनावर मात केली आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील अनेक देशात लॉकडाउन घेण्यात आला होता. भारत आणि न्यूझीलंड या देशात जवळपास एकाचवेळी लॉकडाउन घेण्यात आला होता. भारतामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे पण करोनाचा प्रादुर्भाव अद्याप तसाच आहे.
याउलट अनलॉक होताना देशातील करोनाचा संसर्ग वेगानं होत असल्याचं समोर आलं आहे. याउलट न्यूझीलंड सारख्या छोट्या देशानं करोनावर यशस्वी मात केली आहे. trtworld च्या वृत्तानुसार, भारतासोबतच लॉकडाउन करणाऱ्या न्यूझीलंडमध्ये गेल्या १०० दिवसांपासून एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नाही. जगातील इतर देशांपुढे न्यूझीलंडनं आज एक आदर्श ठेवला आहे.