कृषीमहाराष्ट्र

पुढचे 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांमध्ये अलर्ट

राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात हलक्या स्वरुपाचा तर तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही परिसरात पुढचे तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे तीन दिवस अति मुसळधार पाऊस असेल त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

तळकोकणात समुद्र किनाऱ्याजवळील परिसरातील नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेलं तापमान कमी झालं आणि हवेत गारवा निर्माण झाल्यानं मुंबईकर सुखावले आहेत.

पश्चिम महाराष्ट्र आणि तळ कोकणता पुढचे तीन दिवस अलर्ट जारी केला आहे. गेल्या आठवड्याभरापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. शुक्रवारी आणि शनिवारीही जिल्ह्यात पावसानं जोर धरला होता. यामुळे या जिल्ह्यात गरज नसताना बाहेर पडू नये.