महाराष्ट्रराजकारण

वयापरत्वे हिंदू धर्मावरचा रागदेखील वाढतोय निलेश राणेंची शरद पवारांवर टीका

Newslive मराठी- सध्या देशात करोनाची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे. राम मंदिराबाबत सध्या कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद मिटला आहे. परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण मिळालं तरी जाणार नाही. 

असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. वयापरत्वे शरद पवार यांचा हिंदू धर्मावरील राग वाटत असल्याचं राणे म्हणालेत.

बातमीची हेडिंग वाचली तेव्हा वाटलं एमआयएम पक्षाचे ओवेसी बोलत आहेत. नंतर शरद पवार यांचं नाव दिसलं. एवढं मात्र खरं शरद पवार यांचं वय बघून कोणी काही बोलत नाही. पण जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर शरद पवार यांचा रागही वाढताना दिसत आहे,” अशी टीका निलेश राणे यांनी केली. त्यांनी ट्विटरवरून शरद पवारांवर निशाणा साधला आहे

महत्वाच्या बातम्या- 

-मुख्यमंत्री राम मंदिर भूमिपूजनाला गेल्यास माझी हरकत नाही- शरद पवार

-व्याघ्र दिन एका दिवसापुरता मर्यादीत राहता कमा नये– मुख्यमंत्री