बातमीराजकारण

भाजपाचे कोणीही आमदार पवारांच्या संपर्कात नाहीत – चंद्रकांत पाटील

Newsliveमराठी – राजकारणात अनेकांचे जुने संबंध असतात. काही आमदारांच्या कामानिमित्त भेटी होत असतात. त्यानुसार काही आमदार कामानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटले असतील. त्यावरुन भाजपाचे आमदार राष्ट्रवादीत जाणार असे बोलले जात आहे. मात्र भाजपाचे कोणीही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात नाहीत.

असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट केले आहे. तसेच, या सरकारमध्ये एवढी खुन्नस काढली जात आहे की, मतदारसंघातील साधी कामंही होत नाहीत, अशा शब्दात महाविकास आघाडी सरकारवर चंद्रकांत पाटील यांनी यावेळी निशाणा देखील साधला.

पुणे महानगरपालिकेत कोथरूडचे आमदार भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या सोबत करोनाच्या पार्श्‍वभूमीवर बैठक झाली. त्यानंतर भाजपाचे काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असल्याबद्दल त्यांना विचारले असता, त्यांनी याबाबतची भूमिका मांडली.

पवार व महाविकासआघाडी त्यांच्या आमदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न करत आहे की, आपले आमदार जात नाहीत आम्हीच त्यांचे आणतो आहेत, असं देखील यावेळी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.