बारामतीमहाराष्ट्र

भोसरी येथे मोफत कर्णबधिर तपासणी शिबीर संपन्न

Newslive मराठी-  खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि स्टार्की फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत कर्णबधिर तपासणी व डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबिर मालिकेतील तिसरे शिबिर आज भोसरी येथे संपन्न झाले.

शुक्रवारी (ता.7) सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत शिबिरात सहभागी झालेल्या सुमारे 210 ज्येष्ठ नागरिकांची कानांची तपासणी करण्यात आली. अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्येक नागरिकाची तपासणी केल्यानंतर श्रवणदोष आढळलेल्या व्यक्तींच्या कानाचे मोजमाप घेण्यात आले. शिबिरात पात्र ठरलेल्या व्यक्तींना डिजिटल श्रवणयंत्र मोफत देण्यात येणार आहे.

याप्रसंगी, विजय लोखंडे, उत्तम आल्हाट, निवृत्ती शिंदे, दत्ता साने, संजय आहेर, प्रकाश सोमवंशी, संदीप पवार, प्रशांत महाजन,  अरुण बोऱ्हाडे,  पंडित गवळी मंदाताई आल्हाट, माधुरी लोखंडे, देविदास गोफणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

महिला बचत गटांचा उद्घाटन समारंभ व मार्गदर्शन शिबिर संपन्न

राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते बाबुराव वायकर यांचा जाहीर सत्कार

शिवजयंतीचे नियोजन करण्यासंदर्भात मनपाची बैठक संपन्न