महाराष्ट्रराजकारण

लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना? – शिवसेना

Newsliveमराठी – पार्थ पवार हे राजकारणात नवीन आहेत. लोकसभेची त्यांची उंच उडी चुकली आहे. त्यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. घरातच राजकीय व्यायामशाळा आहे. त्यामुळे मल्लखांब वगैरे कसरतीचे प्रयोग करून कसदार बनायची संधी आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे. राजकीय वर्तुळात तसंच सर्वसामान्यांमध्ये सध्या शरद पवार आणि पार्थ पवार यांची चर्चा सुरु आहे. शरद पवारांनी पार्थ पवार यांना अपरिपक्व म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे. “शरद पवारांचे बोलणे हे आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद यादृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल,” असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जखमी करायची असा डाव पडद्यामागून रचला जात आहे, हे समजून घेतले पाहिजे. त्याकरिता लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना? अशी शंका घेण्यास वाव असल्याचंही शिवसेनेने म्हटलं आहे.