महाराष्ट्रराजकारण

जवानांना नॉन बुलेट प्रूफ ट्रक तर पंतप्रधानांसाठी कोट्यवधींचं विमान- राहुल गांधी

काँगेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्हीव्हीआयपींसाठी विमान खरेदी करण्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. शनिवारी त्यांनी ट्रकमधून प्रवास करणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

बुलेट प्रूफ नसलेल्या ट्रकमधून सैनिकांना शहीद होण्यासाठी पाठवले जात आहे. असे कॅप्शन लिहून त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकावर बोचरी टीका केली आहे. राहुल यांनी ट्वीट करून म्हटले आहे की आमच्या सैनिकांना बुलेट प्रूफ नसलेल्या ट्रकमधून शहीद करण्यासाठी पाठवलं जात आहे. तर पंतप्रधानांसाठी ८४०० कोटी रुपयांचे विमान.हा न्याय आहे का? पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यासाठी केंद्र सरकारने खरेदी केलेल्या व्हीव्हीआयपी विमानावरून राहुल यांनी मोदी सरकारवर हल्ला केला आहे.

गेल्या आठवड्यात राहुल गांधींनी पंजाबमधील कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी आयोजित सभेत बोलतानाही हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८००० कोटींची दोन विमानं खरेदी केली आहेत. दुसरीकडे चीन आपल्या सीमेवर आहे आणि सुरक्षा जवान सीमेच्या सुरक्षेसाठी थंडीचा सामना करत आहेत.