कोरोनामहाराष्ट्र

मास्कची सवय नाही, तर लावा- अजित पवार

सध्या पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. यासाठी प्रशासन सर्व तरेने प्रयत्न करत आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणायचा असेल सर्व सुरक्षेचे नियम पाळलेच पाहिजेत. घराबाहेर पडण्यावेळी मास्क वापरणे बंधनकारक आहे. ज्यांना सवय नाही, त्यांना सवय लावा, जनजागृती करा वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई करा. मात्र, कारवाई करणे हा उद्देश नसून स्वत: अणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरणे मुख्य उद्देश आहे, असे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी करोना आढावा बैठकीत सांगितले.

जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानभवन येथे शहरासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी बहुतांश लोकप्रतिनिधींनी नागरिक मास्क वापरत नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पाळत नाही.

त्यामुळे संसर्ग वाढत असल्याचे सांगितले. जी व्यक्ती मास्क वापरणार नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून समज द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मास्क न वापरणाऱ्यांवर दंड देखील आकारण्यात येत आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत.