महाराष्ट्रराजकारण

उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी घोषणा केलेल्या 1 कोटी मधला एक रुपया ही आला नाही!

Newslive मराठी-  मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्यांनी, नोव्हेंबरमध्ये मी पहिल्यांदा अयोध्येत आलो होतो आणि एक वर्षानंतर नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री झालो, असा योगायोगही यावेळी त्यांनी सांगितला होता. मला कळालं की ट्रस्टचं एक बँक अकाऊंट तयार झालं आहे. त्यामुळे शिवसेना ट्रस्टच्या वतीनं १ कोटी रुपयांचा निधी आम्ही राम मंदिराच्या उभारणीसाठी देत आहोत. याचा ट्रस्टने स्विकार करावा, असं ठाकरे म्हणाले होते.

5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार असून अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. तर, शिवसेनेने राम मंदिरासाठी घोषणा केलेल्या 1 कोटीपैकी 1 रुपयाही आला नसल्याचं राममंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितलं आहे. तसेच, एका महिन्याच्या आत प्रत्यक्ष काम सुरू होईल. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना बोलावलं नसल्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, सर्वांना बोलावलं जाईल.

दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे यांना चिमटा काढला आहे. राममंदिराच्या पायाभरणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण आले किंवा नाही आले, तरी पायाभरणीला त्यांनी जावे. शिवसेनेचा नारा होता की ‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर असे झाले आहे. अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.