महाराष्ट्रलक्षवेधी

आता सरकारी योजनेअंतर्गत मिळवा ३.५० लाखात घर

प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले एखादे स्वतःचे घर असावे. मात्र आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने प्रत्येकाला हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. आता हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून फक्त ३ लाख ५० हजार रुपयांत शहरी भागात घर मिळणार आहे. credit linked subsidy चा कालावधी पुन्हा एकदा ३१ मार्च पर्यंत वाढवण्यात आला आहे. २५ जून २०१५ ही योजना सुरू झाली आणि अडीच लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

यामध्ये कमी उत्पन्न असलेल्या गटातील व्यक्तींना आपले पहिले घर घेताना हे अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश आवास विकास परिषद यांच्यातर्फे ३५०० घरांचे बुकिंग सुरू झाले आहे. अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून मैनपुरी, फतेहपुर, हरदोई, रायबरेली, मेरठ, कानपुर देहात, उन्नाव, बहराइज, मऊ, बलरामपुर आणि बाराबंकी या शहरात घरांचे बांधकाम केले जाणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी pmaymis.giv.in/ या वेबसाईटवर नावनोंदणी करायची आहे. सर्वात आधी वेबसाईटवर जा आणि आपली कॅटेगरी निवडा. LIG, MIG आणि EWS यापैकी एक किंवा दोन किंवा तिन्ही पर्याय आपण निवडू शकता. त्यानंतर आधार नंबर टाकून पुढे आधार कार्डवरील आपले नाव टाका. आपले नाव योग्य लिहा. मग पुढील सर्व माहिती भरून दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. पुढे अर्जाची फी दिलेली असेल जी १०० रुपये आहे. ती फी भरून टाका. मग बँकेत कर्जाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ५००० रुपये एवढे शुल्क आहे. या साध्या आणि सरळ प्रक्रियेनंतर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.