आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

आता मी आणि माझं कुटुंब आत्महत्या करतो, मग याला जबाबदार कोण- रिया चक्रवर्ती

सुशांत सिंह प्रकरणी आरोपाला कंटाळून रियाने ऐका वृतवाहिनी बोलताना अनेक खुलासा केले आहेत. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मला ही आत्महत्या करावीशी वाटते. काही दिवसांपासून माझ्या मनात आत्महत्येचे विचार आले, असल्याचे रिया म्हणाली आहे. मी तर म्हणते, एक बंदूक घेऊन या. माझे कुटुंब रांगेत उभे राहील. आम्हाला गोळ्या घालून संपवा. नाही तर आम्ही आत्महत्या करतो. मग याची जबाबदारी कोणाची? माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.

अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांच्या संपर्कात आल्याचे, अंमली पदार्थ सुशांतला दिल्याचे आरोप माझ्यावर झाले आहेत. यावर मी सध्या काही बोलणार नाही. कारण कदाचित त्याचा परिणाम तपासावर होऊ शकतो, असे रिया वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली आहे.

सर्व आरोपाला सामोरे जाऊन रियानं तिच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहे. हे आरोप वेदनादायी असल्याचं रियानं म्हटलं आहे. सीबीआय याप्रकरणी अजून माहिती घेत आहे.